Manasvi Choudhary
बॉलिवूडची 'धक धक गर्ल' म्हणजेच अभिनेत्री माधुरी दिक्षीत तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.
नुकतंच सोशल मीडियावर माधुरीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
गुलाबी साडीत माधुरी कमालीची सुंदर दिसत आहे. तिचं सौंदर्य पाहून तुम्हीही प्रेमात पडाल. नेटकऱ्यांनीही फोटोवर लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तुम्ही देखील हे फोटो पाहिल्यानंतर विचार कराल की, वयाची पन्नाशी ओलांडली तरी माधुरी किती सुंदर दिसतेय.
माधुरी दिक्षीतने तिच्या पारंपारिक लूकला थोडा मॉडर्न टच दिला आहे. गुलाबी साडीवर तिने स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
साडीवर फ्लोरल एम्ब्रॉयडरी डिझाईन आहे. जो तिच्या सिंपल लूकवर अधिक उठून दिसत आहे.
साडीवर मॅचिंग ज्वेलरी घातली आहे. तिने कानातले, हातात अंगठ्या आणि हलकासा गुलाबी मेकअप केला आहे.
केसांची स्टाईल आणि फूले माळली आहेत ज्यामुळे लूक अधिकच आकर्षक दिसतो आहे.