Manasvi Choudhary
पावसाळ्याला सुरूवात झाली की, आहारात बदल करणे महत्वाचे आहे. पावसाळ्यात नेमके काय खावे आणि काय खाऊ नये? याबाबत अनेकांना संभ्रम असतो.
पावसाळ्यात आंबे खावे की नाही? असा प्रश्न अनेकांना होतो. यामागचे कारण या वेबस्टोरीतून समजून घ्या.
पावसाळ्यात आंबा खाऊ नका असं म्हटलं जातं. घरातील मोठी मंडळी देखील सांगताना तुम्ही ऐकलच असेल. मात्र पावसाळ्यात आंबा का खाऊ नये? यागची कारणे काय आहेत? पाहूया.
आंबा उष्ण पदार्थ आहे. यामुळे पावसाळ्यात जर तुम्ही आंबा खाल्ला तर सर्दी, कफ, वाताचा त्रास होऊ शकतो.
आंबा उष्ण असल्याने त्वचेच्या समस्या उद्भवतात. चेहऱ्यावर मुरूमे, पुरळ येतात.
पावसाळ्यात आंबा खाल्ल्याने पोटफुगी, जळजळ, आम्लपित्त होण्याची शक्यता अधिक असते.
पावसाळ्यात आंबा खराब होऊ शकतो यामुळे खाऊ नये असं म्हटलं जातं. तसेच त्यात बॅक्टेरिया जमा होऊ शकतो.
जर तुम्हाला आंबा खायचा असेल तर तुम्ही खाण्यापूर्वी आंबा पाण्यात भिजवून ठेवा म्हणजे त्यातील उष्णता कमी होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.