Harshavardhan Patil Sharad Pawar meets in mumbai  saam tv
Video

Harshvardhan Patil News : शरद पवारांनी डाव टाकलाच! हर्षवर्धन पाटील 'तुतारी' हाती घेणार?

Harshvardhan Patil likely to join NCP SP : भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे काही दिवसांतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते. सिल्व्हर ओकवर नुकतीच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.

Saam Tv

Harshvardhan Patil-Sharad Pawar Meeting : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळं आता पक्षप्रवेशांची चर्चा होणारच. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. पण आता या चर्चेला अधिक बळ मिळालंय. हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळं पाटील हे तुतारी हाती घेणार हे जवळपास फिक्स झालं आहे. आता फक्त अधिकृत घोषणा व्हायची आहे, असंच चित्र आता तरी दिसतंय. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांची उद्या पत्रकार परिषद होणार आहे. पुढील चार दिवसांत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील आणि मुलगा राजवर्धन पाटील यांनी सोशल मीडियावर स्टेट्सवर तुतारी चिन्ह ठेवलंय. त्यामुळं प्रवेश तर होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तसंच इंदापूरच्या उमेदवारीवरून पाटील आणि पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

SCROLL FOR NEXT