Nandurbar mayor candidate Vishwas Badoge arrested Saam
Video

मोठी बातमी! नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला गुजरात पोलिसांनी केली अटक, नेमकं प्रकरण काय ?

Nandurbar News : नंदुरबार नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विश्वास बडोगे यांना गुजरात पोलिसांनी दहशतवाद आणि संघटित गुन्हे नियंत्रणाशी संबंधित कलमांनुसार अटक केली. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वातावरण तापले.

Namdeo Kumbhar

Nandurbar mayor candidate Vishwas Badoge arrested by Gujarat Police नंदुरबारमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठी खळबळ उडालीय.. नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार विश्वास बडोगेंना गुजरात पोलिसांनी अटक केलीय. दहशतवाद आणि संघटित गुन्हे नियंत्रणाशी संबंधित कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मिळतेय. निवडणुकीच्या काळात झालेल्या या अटकेमुळे राजकीय वातावरण तापले असून स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आलंय. या कारवाईचा निवडणूक लढतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तिसरी आघाडी करून निवडणूक लढवणाऱ्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवाराला गुजरात पोलिसांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. नवापूर नगर परिषदेसाठी जिल्हा विकास आघाडीचे म्हणून संपूर्ण पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवणारे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे गुजरात पोलिसांच्या जाळ्यात अडकले. विश्वास बडोगे यांच्यावर गुजरात राज्यात 25 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. दारू तस्करीच्या आरोपाखाली गुजरात राज्यात अनेक गुन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात कोयता गँगचा हैदोस! २५ ते ३० वाहनांची तोडफोड, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राहाता तालुक्यातील साकुरी गावात बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Kolhapur Baba : चुटक्या वाजवत भूत उतरवणाऱ्या भोंदू बाबाला अटक, कोल्हापूर पोलिसांची कारवाई

''३० व्या मजल्यावरच्या खिडकीत उतरुन..'', अनंत गर्जेने पत्नीच्या टोकाच्या पावलावर दिली प्रतिक्रिया, प्रकरणात नवा ट्वीस्ट?

Kalyan : कल्याणमधील धक्कादायक प्रकार! महाविद्यालयातच नमाज पठण

SCROLL FOR NEXT