Relatives and villagers gather at Ugav village after a distressed grape farmer ends his life following vineyard loss in Niphad, Nashik district. Saam Tv
Video

द्राक्ष पंढरीत खळबळ! शेतकरी बागेत फिरायला गेला आणि... काही क्षणांत घेतलं विष|VIDEO

Grape Farmer Suicide In Niphad Nashik District: नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात उगाव येथील द्राक्ष शेतकऱ्याने द्राक्ष बागेची उध्वस्त स्थिती पाहून विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Omkar Sonawane

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

द्राक्षे शेतीतून उध्वस्त झालेल्या उगाव ता.निफाड येथील शेतकऱ्याने आज सकाळी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. सधन मानल्या जाणाऱ्या द्राक्षे शेतीला कोरोना काळापासून ग्रहण लागले असून आता द्राक्षे उत्पादकही आत्महत्या करू लागल्याने द्राक्षे पंढरीत खळबळ उडाली आहे.उगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कैलास यादव पानगव्हाणे हे आज सकाळी ८.३० च्या सुमारास द्राक्षे बागेत फेरफटका मारत असतांना त्यांना द्राक्षे बागेची उध्वस्त परिस्थिती पहावली नाही. त्यामुळे त्यांनी द्राक्षे बागेचे विषारी औषध सेवन केले.

कुटुंबियांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्यांना तातडीने निफाड ग्रामीण रुग्णालयात नेले मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. संबंधित शेतकऱ्यावर बँक, सोसायटी व सावकारी कर्ज होते. हा द्राक्षे हंगाम चांगला जाऊन आपण कर्जमुक्त होऊ अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र द्राक्षे बागेची परिस्थिती पाहून सात आठ दिवसांपासून त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती. राज्यसरकारने नुकसानग्रस्त द्राक्ष पिकाचे सप्टेंबर महिन्यात द्राक्ष माल नसतांना पंचनामे केले आणि त्याआधारे तुटपुंजी मदत केली. त्यामुळे द्राक्षे हंगाम सुरू झाल्याने सरकारने फेर वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, कर्जमाफी करावी अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्याच्या जुन्नरमधील बिबट्या शिफ्ट करणार

Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच काढलं, आयसीसीनं बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

Pune News : सूर्योदयापूर्वी अवैध धंदे तोडून टाका; पुणे पोलीस आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Apurva Gore: आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज; फोटो पाहा

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात कोणते उद्योगधंदे भरभराटीस होते?

SCROLL FOR NEXT