Pandharpur Wari Saam TV
Video

Pandharpur Wari : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, १० जुलैपर्यंत टोलमाफी|VIDEO

Toll Free For Warkari : आषाढी वारीसाठी १० मानाच्या पालख्या मार्गांवरील टोल १८ जून ते १० जुलैपर्यंत पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आषाढी वारीसाठी सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने १८ जून ते १० जुलै या कालावधित १० मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवरील टोल पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पालख्या नेणाऱ्या वाहनांसह त्यांच्यासोबत असणाऱ्या वारकऱ्यांना आणि भाविकांना टोल भरावा लागणार नाही. वारकऱ्यांना अर्थिक दिलासा मिळणार असून, वारीचा प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे.

शासनाच्या टोलमाफी निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन विविध सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. या निर्णयामुळे वारकऱ्यांचा वारीतील उत्साह अधिक वाढणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT