Maratha protesters facing severe hardships as food and water are reportedly denied during the ongoing agitation in Mumbai Saam Tv
Video

Maratha Protest: आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून अमानुष डावपेच? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आरोप|VIDEO

Maratha Protester: मराठा आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून अन्न आणि पाणी रोखण्याचा अमानुष डावपेच रचल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अजित नवले यांनी नागरिकांना आंदोलकांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.

Omkar Sonawane

मराठा आंदोलकांना अन्न व पाणी नाकारल्याच्या बातम्या समोर

सरकारच्या डावपेचांवर अमानवीयतेचे आरोप

अजित नवले यांनी नागरिकांना आंदोलकांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन

आंदोलनात सहभागी शेतकरी अन्न व पाण्याच्या टंचाईला सामोरे

मराठा आंदोलकांना जेवण व पाणी मिळू नये यासाठी हॉटेल्स बंद करण्यात आल्याच्या बातम्या आहेत. पिण्याचे पाणी सुद्धा त्यांना मिळू नये यासाठी डावपेच केले जात आहेत. लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा व मते मांडण्याचा अधिकार आहे असे एकीकडे म्हणायचे व दुसरीकडे अन्न आणि पाण्यापासून आंदोलकांची कोंडी करायची. सत्ताधाऱ्यांची ही कृती लोकशाही विरोधी तर आहेच शिवाय ती अमानवीय कृती सुद्धा आहे. मागण्यांबद्दल वेगवेगळी मते असू शकतात.

मात्र, मानवते बद्दल वेगळे मत असू शकत नाही.आंदोलनासाठी गाव गाड्यातून आलेल्या शेतकरी पोरांना जेवायला मिळू नये, पिण्याला पाणी सुद्धा मिळू नये, अशा प्रकारे जर कोणी प्रयत्न करत असतील तर ते संपूर्णपणे चुकीचे आहे. मानवतेचे दर्शन घडवित, किसान सभेच्या लॉन्ग मार्चच्या वेळी शेतकऱ्यांचे ज्या उदात्तपणे शहरवासीयांनी स्वागत केले व प्रसंगी घासातला घास देऊ केला त्याच प्रकारे महाराष्ट्रभरातील लाखो शेतकऱ्यांची पोरं या मोर्चासाठी शहरात आली आहेत. शहरवासीयांनी त्यांनाही घासातला घास देत अन्न, पाणी व निवासाची व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करावे व मानवतेचे दर्शन घडवावे असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित नवले करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

...म्हणूनच देवेंद्र फडणवीस-अमित शाहांनी लालबागच्या राजाचं अन्नछत्र बंद केलं, मनोज जरांगेंचा आरोप

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक

Upvasache Modak Recipe : घरीच १० मिनिटांत बनवा उपवासाचे मोदक, गणपतीला दाखवा स्पेशल नैवेद्य

Flipkart BBD Sale 2025: फ्लिपकार्ट Big Billion Days सेल लवकरच सुरू होणार, मिळणार डिस्काउंट्स आणि कॅशबॅक ऑफर्स

Jaya Bachchan : पापाराझींना पोज दिली अन् हसून साधला संवाद, जया बच्चन यांचा 'तो' VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT