when will Ladki Bahin amount become ₹2100 : राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात प्रति महिना १५०० रूपयांचं मानधन जमा केले जातो. या योजनेअंतर्गत लाडकीच्या खात्यावर २१०० रूपये देऊयात, असे अश्वासन सरकारकडून देण्यात आलेय. आता यावरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठं वक्तव्य केले. लाडक्या बहिणींचे २१०० रुपये करणार असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय...मी जे बोलतो ते करुन दाखवतो असंही ते म्हणालेत..महायुतीनं विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती मात्र अजूनही ती पूर्ण केलेली नाही.मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा शब्द दिलाय
माझ्या आईची काटकसर आणि माझ्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पहिले होते, म्हणून मी याचा विचार करुन महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. १५०० रुपये लाडक्या बहिणींना देतो त्याच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत. आता, १५०० रुपयांचे २१०० रुपये योग्यवेळी करणार, हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आम्ही पाळणार आहोत, मी बोलतो ते करून दाखवतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.