Youths seen risking their lives in flooded Godavari river near Ramkund despite repeated warnings from the authorities. Temples partially submerged. Saam tv
Video

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Godavari River Flood: नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुरामुळे रामकुंड परिसर जलमय झाला असून काही तरुण पुराच्या पाण्यात स्टंट करताना दिसत आहेत.

Omkar Sonawane

नाशिकमध्ये सलग १५ व्या दिवशी गोदावरी नदीची पूरस्थिती कायम असून, रामकुंड आणि गोदाघाट परिसरात पुराच्या पाण्याचा वेढा अजूनही कायम आहे. गंगापूर धरणातून सध्या ३,७१६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पावसामुळे गोदावरीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले असून, परिसरातील मंदिरांनाही पुराच्या पाण्याने वेढलं आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने सतर्कतेचे निर्देश दिले असतानाही काही अतिउत्साही नागरिक पुराच्या पाण्यात धुडगूस घालताना दिसून येत आहेत. पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करत असून सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले रक्षक गायब असल्याने या हुल्लडबाजांवर कुठलेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. सध्या या भागात पूर नियंत्रणासाठी कोणतेही अडथळे नकोत, म्हणून प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी जाणे टाळावे, असा इशारा दिला आहे. मात्र तो सर्रासपणे पायदळी तुडवल्या जात असल्याचे दुर्दैवी वास्तव समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apurva Gore: खणाची साडी अन् निखळ हास्य, अपूर्वाचा लूक पाहून चाहते घायाळ

Vastu Tips: घरात धन, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास हवा आहे? अवश्य फॉलो करा 'या' वास्तु टिप्स

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात पावसाची रिपरिप; बळीराजा सुखावला

Beed News: धनंजय मुंडेंचं आयुष्य उद्ध्वस्त करून वाल्मिक कराडला मंत्री व्हायचं होतं – बाळा बांगरांचा गंभीर दावा|VIDEO

Mumbai To Kargil : मुंबई ते कारगिल प्रवास कसा करायचा? जाणून घ्या मार्ग, आणि एकूण खर्च

SCROLL FOR NEXT