Global Impact Forum 2026 Saam tv
Video

Global Impact Forum 2026: 'ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २'चं मुंबईत उद्घाटन, BRICSमुळे जग जवळ येईल; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

CM Devendra Fadnavis: 'ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २'चं मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी BRICSमुळे जग जवळ येईल असा विश्वास व्यक्त केला.

Priya More

मुंबईमध्ये एपी ग्लोबलतर्फे ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला. त्यांनी जागतिक सहकार्य, सांस्कृतिक संवाद, वसुवैध कुटुंबकम आणि बीआरआयसीएसच्या भूमिकेवर त्यांनी भाष्य केले.

मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २ ची दिमाखात सुरुवात झाली. एपी ग्लोबलच्या संचालिका जान्हवी पवार यांनी उद्घाटनपर भाषणात भारताच्या सभ्यताविषयक वारशासोबतच BRICS देशांमधील समानता, सहकार्य आणि जागतिक भागीदारीवर भर दिला.

ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि चीनसोबतच्या विविध सांस्कृतिक आणि सामाजिक समानतांचा उल्लेख करत त्यांनी ‘Competition’ पेक्षा ‘Collaboration’वर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राजदूत, कौन्सिल जनरल, मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जगातील वाढती विभागणी, विविध संस्कृती आणि विचारांमधील अंतर कमी करण्यासाठी जगभरातील लोकं, देश आणि सामाजिक मूल्यांमधील संवाद आणि सहकार्य करण्याची करण्याची गरज आहे. फक्त आर्थिक संवाद पुरेसा नसून संस्कृती, लोक आणि देशांमधील संवादातून अधिक व्यापक सहकार्याचा मार्ग तयार होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Alert: नोकरी सोडली तरी PF वर मिळणार व्याज? EPFO चा हा नियम नक्की जाणून घ्या

Child nutrition: पॅकेज्ड पदार्थ आणि गोड पेयांमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम? पालकांनी आहाराबाबत या चुका टाळायलाच हव्यात

KBC 18: 'ट्रेनिंगमध्ये साप खावे लागतात...'; CRPF कमांडेंटचा बिग बॉसमध्ये मोठा खुलासा

Maharashtra News Live Update: पेणमध्ये दिव्यांग मुलांनी फोडली दहीहंडी; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

Salman Khan: 'हे तुझं काम नाही..'; बिग बॉस २०च्या प्रीमियर शूटिंगदरम्यान सलमान खान संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT