Forest officials capture the leopard that entered the Nashik residential area, as Minister Girish Mahajan reviews the rescue operation. Saam Tv
Video

बिबट्याचा प्रश्न आपत्ती म्हणून माझ्याकडे सोपवा; गिरीश महाजणांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी|VIDEO

Nashik Leopard Scare: नाशिकमध्ये दोन बिबटे शिरल्यानंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी बिबट्यांच्या वाढत्या समस्येला ‘आपत्ती’ घोषित करून हा विषय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सोपवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली.

Omkar Sonawane

नाशिकच्या गंगापूर रोड भागातील संत कबीर नगर झोपडपट्टी आणि वन विहार सोसायटीमध्ये बिबट्या शिरला होता. आता मिळालेल्या माहितीनुसार दोन बिबटे होते. यापैकी एक बिबट्या पळून गेला. तर दूसरा बिबट्या हा नागरी वस्तीत शिरला. त्यानंतर वनविभागाच पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या शिताफीने त्याला जेरबंद केले.

याच ठिकाणी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे देखील पोहोचले. यावेळी महाजन म्हणाले, बिबट्यांच्या वाढत्या समस्येला 'आपत्ती' म्हणून घोषित करून, हा विषय आपल्या विभागाकडे सोपवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. महाजन यांनी मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाल्याचे सांगितले.

एका मादी बिबट्याने वर्षाला आठ पिल्लांना जन्म दिल्यास लोकसंख्या किती वेगाने वाढेल, यावर त्यांनी चिंता व्यक्त केली. मानवी वस्तीत येऊन लहान मुले आणि पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी पिंजऱ्यांची आणि मनुष्यबळाची संख्या वाढवणे, तसेच पकडलेल्या बिबट्यांना गुजरातसारख्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणे यांसारख्या उपायांवर शासन विचार करत असल्याचे ते म्हणाले. बचावकार्यात नागरिकांनी अडथळा न आणण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवले पूल अपघात टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांची अजून एक नवीन उपाय योजना

School Holiday: महत्त्वाची बातमी! आज राज्यातील शाळांना सुट्टी; का राहणार बंद? वाचा सविस्तर

उद्धव ठाकरे-काँग्रेसमधला दुरावा मिटणार? मनसेसोबतच्या युतीवर मोठा निर्णय? VIDEO

Todays Horoscope: या राशींना आज कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल, वाचा राशीभविष्य

IAS Transfer: महापालिका निवडणुकीआधीच बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, अविनाश ढाकणे BMC चे नवे अतिरिक्त आयुक्त

SCROLL FOR NEXT