Sambhajinagar Rain SAAM TV
Video

Sambhajinagar Rain : संभाजीनगरमध्ये अतिवृष्टी, शेतामध्ये तलावासारखे पाणी, मदत न मिळाल्यास शेतकर्‍याचा आत्महत्येचा इशारा | VIDEO

Sambhajinagar Crop Loss : छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले आहे. तात्काळ मदत न मिळाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, असा शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना इशारा दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा गावात मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पूराचे पाणी शिरले असून मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.शेतामध्ये गुडघ्याएवढे पाणी साचल्याने मक्याचे पीक सडून गेले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हातात सडलेला मका घेऊन शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांकडे तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. जर तात्काळ मदत न मिळाल्यास आत्महत्येशिवाय आमच्यासमोर पर्याय शिल्लक राहणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या कष्टाचे पीक वाया गेल्याने शेतकरी हतबल झालेला दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतूकसाठी बंद, हत्तूर पूल पूर्णतः पाण्याखाली गेला

Dussehra 2025 : लव्ह लाइफ, करिअर, पैशांची तंगी; सर्व समस्या होतील दूर, फक्त दसऱ्याला करा 'हे' उपाय

Railway Diwali Bonus : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता, बोनस कधी मिळणार? मोठी अपडेट

Nandurbar Tribal Agitation: आदिवासी मोर्चाला हिंसक वळण; आंदोलनात दगडफेक,वाहनांची तोडफोड

लिव्हर कॅन्सरच्या सुरूवातीला दिसून येतं 'हे' एक लक्षण

SCROLL FOR NEXT