राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता अदानी यांच्या अडचणीत आणखीन वाढ झालेली दिसत आहे. अमेरिकेतील न्यायालयाने अदानी समूहावर लाचखोरी आणि गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे. कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 मिलियन डॉलरची लाच दिल्याचा अदानींवर आरोप आहे. या प्रकरणी न्यूयॉर्कमध्ये फौजदारी खटला दाखल झालाय. त्यामुळे आज शेअर मार्केटवर देखील याचा परिणाम दिसून आला आहे. ईस्ट डिस्ट्रिक्ट ऑफ न्यूयॉर्कमध्ये अदानी यांच्यासह 7 अधिकाऱ्यांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे. 2020 ते 2024 दरम्यान सौरऊर्जा प्रकल्पासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 मिलियनची लाच दिल्याचा आरोप अदानी यांच्यावर करण्यात आला आहे. सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पातून 20 वर्षात 2 अब्ज डॉलरचा नफा मिळवण्याची ही योजना आहे. अमेरिकन आणि जागतिक गुंतवणूकदारांपासून हा भ्रष्टाचार लपवण्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे. इतकंच नाही तर गौतम अदानी यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.