LPG cylinder Saam TV Marathi
Video

LPG cylinder : कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद, कोल्हापूरमध्ये गॅस सिलिंडरची नेमकी स्थिती काय? वाचा

LPG shortage in Maharashtra news : कोल्हापूर जिल्ह्यात कमर्शियल गॅसचा पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आल्यामुळे हॉटेल्स आणि खाजगी मेस चालक अडचणीत आले आहेत. गॅस सिलेंडर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांसाठी जेवणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Namdeo Kumbhar

कोल्हापूर जिल्ह्यात कमर्शियल गॅसचा पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. अवैध साठा करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. हॉटेल्स आणि उद्योगांचा पुरवठा थांबला असला तरी हॉस्पिटल्स, निवासी शाळा आणि घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवला आहे. गॅस जपून वापरण्याचे आवाहन करत प्रशासनाने लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल, अशी ग्वाही दिली आहे.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या बाहेर विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या खाजगी मेस आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मेस चालकांना गेल्या तीन दिवसांपासून गॅस सिलेंडर मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवणे कठीण झाले आहे. अनेक मेस चालकांनी आज संध्याकाळी विद्यार्थ्यांसाठी शेवटचा डबा देण्याचा निर्णय घेतला असून उद्यापासून बहुतांश मेस बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोल्हापुरात शिक्षणासाठी आलेल्या हजारो विद्यार्थ्यांसमोर जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरगावाहून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी शहरात अनेक खाजगी मेस सुरू आहेत. मात्र सध्या कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मेस चालकांची मोठी अडचण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून गॅस सिलेंडर मिळत नसल्याने मेसमध्ये स्वयंपाक करणे कठीण झाले आहे. शहरातील अनेक मेस चालकांनी उरलेल्या गॅसवर आज संध्याकाळपर्यंतच जेवण बनवण्याची तयारी केली असून त्यानंतर गॅस मिळाला नाही तर मेस बंद ठेवावी लागेल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर जेवणाचा मोठा प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apurva Nemlekar: स्विमिंगपूलमधील शेवंताचे हॉट फोटो व्हायरल; पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर

Maharashtra News Live Update : भंडाऱ्यात पावसाची जोरदार हजेरी...४३ अंशांच्या तडाख्यानंतर जिल्हावासीयांना सुखद दिलासा!

Vinchu Chavlyavr Upay: विंचू चावल्यास काय करावे? घरगुती उपचार काय? वाचा...

Aadhar Card : मोठी बातमी! आधार कार्डमधील नाव, पत्ता अपडेटसाठी मोजावे लागतील पैसे, किती असणार शुल्क?

Indian railway: भारतीय रेल्वे रोज किती कोटींची वीज वापरते? आकडा ऐकून तुम्ही थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT