Gadchiroli Rain: गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून गडचिरोली-आष्टी या राष्ट्रीय महामार्गासह अनेक मार्ग बंद झाले आहेत. पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड शहरातील बाजारपेठ पाण्याखाली गेली असून तालुक्यातील 120 गावांचा संपर्क तुटला आहे. गडचिरोली सीमेलगत छत्तीसगड राज्यातील जगदलपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्याने गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड जवळून वाहणारी इंद्रावती पर्लकोट पामुलगौतम नदी दुथडी भरुन वाहत आहे. पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आलापल्ली-भामरागड रस्ताही बंद झाला आहे. त्यामुळे भामरागड येथील बाजारपेठ पाण्याखाली गेले 50 घरांमध्ये पाणी शिरले.अजूनही पाणी वाढत आहे आणि काही घरे धोकाच्या पातळीवर आहे. सुरक्षित स्थळ सामान हलविण्यात येत आहे. पुराच्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.