Former Sambhaji Brigade leader Dr. Gajanan Pardhi assaulted by woman in Akola over molestation allegations; party expels him after public outrage. Saam Tv
Video

Sambhaji Brigade: छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षाला चोपलं, गाडी थांबवून महिलेनं दिला चपलेचा प्रसाद|VIDEO

Shocking Incident: अकोल्यातील मुर्तीजापूरमध्ये संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष गजानन पारधी यांना छेडछाडीच्या आरोपाखाली एका महिलेने चपलेने बेदम मारहाण केली.

Omkar Sonawane

संभाजी ब्रिगेड पक्षाच्या माजी प्रदेश कार्याध्यक्षाला एका महिलेने मोठा चोप दिलाय, छेडखानी केली असल्याचा आरोप करीत त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यात हा संपूर्ण प्रकार घडला आहे. डॉ. गजानन पारधी हे संभाजी ब्रिगेड पक्षाच्या माजी प्रदेश कार्याध्यक्ष होते. एका महिलेकडून छेडखानी केल्याचा आरोप करीत त्यांना चप्पलेचा चोप देत मारहाण झाली होती. अकोला येथील मुर्तीजापुर पोलीस हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला होता. मात्र अजून पर्यंत सदर महिलेने गुन्हा दाखल केला नाहीये.

या प्रकरणामुळे पक्षाने त्यांच्यावर गंभीर दखल घेत कारवाई केली आहे. डॉ. गजानन पारधी यांच्यावर पक्षविरोधी कारवाई आणि गैरवर्तन करत पक्ष संघटनेची प्रतिमा मलीन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याबद्दल कायम बडतर्फ करण्यात आले आहे. या संदर्भात पक्षाने एक अधिकृत पत्र काढत पारधी यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. ते पत्र देखील आता समोर आलंय. मुर्तीजापुर तालुक्यात या महिलेने पारधीला चांगलाच चोप दिला होता. ब्लॅकमेलिंग, पैशाची मागणी, फोटो व्हिडिओ वायरल करण्याची धमकी, तसेच छेडखानी केल्याचा आरोप यादरम्यान महिलेने केला होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : जिवाभावाचा मित्र वाढदिवसाला आलाच नाही, संतापलेल्या दोस्तांनी २५ वाहनांची केली तोडफोड

Friday Horoscope : जवळच्या लोकांकडून वाहवाह होईल, प्रगती घडेल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Red Alert in Maharashtra : पाऊस आज कहर करणार, ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट, IMD च्या इशाऱ्यानंतर २ जिल्ह्यातील शाळा-कॉलेज बंद

Shukrwar che Upay: शुक्रवारच्या 'या' उपायांनी भाग्याचे दरवाजे उघडतील; घरात सुख-समृद्धी सोबत पैसाही येईल

Todays Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना आज जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT