
आजचे पंचांग
शुक्रवार,२५ जुलै २०२५,श्रावण शुक्लपक्ष.
तिथी-प्रतिपदा २३|२३
रास-कर्क
नक्षत्र- पुष्य
योग-वज्र ०७|५८
सिद्धीयोग२९|३२
करण-किंस्तुघ्न
दिनविशेष-चांगला दिवस
मेष - भरभराटीच्या दृष्टीने आज दिवस चांगला आहे. घरामध्ये काहीतरी नवी खरेदी होईल. खेळीमेळीचे वातावरण कुटुंबामध्ये राहणार आहे. वाहन सौख्य उत्तम आहे.
वृषभ - कलाकार लोकांना विशेष कामाच्या संधी मिळतील. लेखन, वक्तृत्व, प्रकाशन या क्षेत्रामध्ये गती आहे. जवळच्या लोकांकडून वाहवाह होईल. दिवस चांगला आहे.
मिथुन - सुखाचा दिवसांत अडचणी आल्या नाहीत तर ते आयुष्य कसे! सगळे ऑलवेल चालू आहे म्हणता म्हणता एखादी गोष्ट मध्ये येते. आज जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. विनाकारण त्यासाठी पैसा खर्च होईल. आलेला पैसा कसा जातो हे लक्षातच येणार नाही.
कर्क - भावनिक असणारी आपली रास कधी कधी आपल्याला जपता जपता इतरांना जपताना कधी तुम्ही हरवून जात आहात. तुमच्या लक्षात येत नाही पण आज मात्र स्वतःला प्राधान्य देऊन कामे कराल. असे दिसते आहे .
सिंह - मानमराताबासाठी कधीकधी हपापले पण आपल्या राशीसाठी अधोरेखित आहे. ठरवाल ते कराल अशा गोष्टी असणारी आपली रास आहे. पण आज या सगळ्याला खिळ बसेल असे दिसते आहे. अडचणीतून वाट काढावी लागेल.
कन्या - बौद्धिकता ठासून भरलेली आपली रास आहे. गोड बोलण्यामुळे व्यवहार ज्ञान उत्तम असल्यामुळे अनेक लोकांना आज जवळ कराल. नव्याने नाती वृद्धिंगत होतील. अनेक प्रकारचे लाभही होतील.
तूळ - चर असणारी आपली रास सातत्याने वेगळे काहीतरी करणे एका ठिकाणी स्थिरता नसणे अशी मानसिकता आपली आहे. कामाच्या बाबतीत आज भ्रमंती होईल. वाहन सौख्याला मात्र दिवस चांगला आहे. प्रगती घडेल .
वृश्चिक - कुलस्वामिनीची उपासना आज फलदायी ठरेल. अनेक कामे एकट्याने आणि नेटाने करावे लागेल. अर्थात त्यात एक वेगळाच आनंदास तुम्ही प्राप्त कराल. तीर्थक्षेत्रि भेटी होतील .
धनु - दोलायमान मनस्थिती राहील. कोणाच्या तरी मार्गदर्शनाची किंवा कुणीतरी आपल्याला सल्ला द्यावा अशी मानसिकता आपली आज तयार होईल. महत्त्वाची कामे दुपारनंतर केलेली बरे राहील .
मकर - आयुष्यात धडपडून, धडपड करून तुम्ही एकट्याने यश खेचून आणलेले आहे. खूपदा कोणाच्या सहकार्याशिवाय सुद्धा तुम्हाला पुढे जावे लागलेले आहे. आज मात्र व्यावसायिक भागीदाराचे सहकार्याने कामाचा मोठा पल्ला पार पाडाल.
कुंभ - तब्येत ,तब्येत आणि तब्येत. असा काहीसा दिवस आहे. विनाकारण शारीरिक,मानसिक, आर्थिक ताण याच्यामुळे तब्येत ढासळेल. केलेल्या कष्टांचे चीज होणार नाही. तरीसुद्धा काम करत राहावे लागेल.
मीन - सद्गुरूंची विशेष कृपा आपल्यावर घडेल. दत्तगुरूंची उपासना करावी. शेअर्समध्ये प्रगती होईल. आपल्यामधील सुप्त गुणांना आज भाव मिळणार आहे. सृजनशीलता वाढेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.