pune Dhankawadi  crime news
CCTV Footage Captures Pune Youths Damaging 25 Vehicles in Dhankawadi Over Birthday DisappointmentSaam TV News Marathi

Pune : जिवाभावाचा मित्र वाढदिवसाला आलाच नाही, संतापलेल्या दोस्तांनी २५ वाहनांची केली तोडफोड

Dhankawadi Pune youth arrested : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पाच ते सात जण जमले होते. पण ज्याच्यासाठी जय्यत तयारी केली तोच आला नाही, त्यामुळे रागाच्या भरात मित्रांनी धनकवाडीमध्ये गाड्यांची तोडफोड केली.
Published on
Summary

वाढदिवसाला मित्र गैरहजर राहिल्याने संतप्त तरुणांची तोडफोड

धनकवडी परिसरात २५ वाहनांवर हल्ला, स्कूलबस, टेम्पो, रिक्षाची तोडफोड

आरोपींमध्ये दोन प्रौढ व तीन अल्पवयीन, सर्वजण नशेत होते

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुणे पोलिसांची जलद कारवाई, ५ जण अटकेत

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते. मंगळवारी सकाळी सुद्धा शहरातील धनकवडी परिसरात तरुणांनी धारदार शस्त्राने वाहनांची तोडफोड करत अनेक दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे मोठं नुकसान केलं. धनकवडी भागात एका टोळक्याने रिक्षा, स्कूलबस, टेम्पो अशा तब्बल २५ वाहनांची तोडफोड केली. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ मागणी आणि परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला.

या घटनेची तात्काळ दखल घेत पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि आज याच प्रकरणातील पाच जणांना अटक केली. वाहनांची तोडफोड करणाऱ्या पाच जणांपैकी तीन जण हे अल्पवयीन आहेत. रोहित कैलास आढाव (वय २३) आणि सुधीर बापू सावंत (वय १९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही किरकीटवाडी परिसरातील रहिवासी आहेत.

pune Dhankawadi  crime news
केडीएमसीमध्ये लाचखोरीचा स्फोट! ३ अधिकाऱ्याला पैसे घेताना रंगेहाथ पकडले, ठाणे जिल्ह्यात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री बारा वाजता आरोपी असलेले पाच जण धनकवडी परिसरात त्यांच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मित्रांचा मात्र निराशा झाली कारण ज्याच्यासाठी आले तो स्वतः त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. या गोष्टीचा राग मनात धरून या तरुणांनी परिसरातील वाहनांवर याचा राग काढायला सुरुवात केली. दारूच्या नशेत असलेले सर्व तरुणांनी जवळ आणलेल्या हत्यारांनी धनकवडी भागातील दुचाकी रिक्षा आणि चार चाकी यांच्या वर तोडफोड करायला सुरुवात केली ज्यामध्ये वाहनांचा मोठं नुकसान झालं. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. पुणे पोलिसांनी तात्काळ या घटनेचा गांभीर्य घेत या तरुणांना पकडण्यासाठी पदके रवाना केली आणि आज या पाच जणांना ताब्यात घेतलं.

pune Dhankawadi  crime news
पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ, नवऱ्याने गळफास घेत आयुष्याचा दोर कापला, बायकोचाही संशयास्पद मृत्यू
Q

पुण्यातील तोडफोडीची ही घटना कुठे घडली?

A

ही घटना पुण्याच्या धनकवडी परिसरात घडली.

Q

तोडफोडीमागचं कारण काय होतं?

A

वाढदिवसासाठी जमलेले मित्र, ज्याच्यासाठी जमले होते तो गैरहजर होता, याचा राग मनात धरून वाहनांची तोडफोड केली.

Q

पोलिसांनी किती आरोपींना अटक केली?

A

एकूण ५ आरोपींना अटक झाली असून त्यात ३ अल्पवयीन आहेत.

Q

या घटनेत किती वाहनांचे नुकसान झाले?

A

तब्बल २५ वाहने फोडण्यात आली, त्यात दुचाकी, रिक्षा, टेम्पो आणि स्कूलबस यांचा समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com