sambhajiraje chhatrapati saam tv
Video

Sambhajiraje Chhatrapati : शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संभाजीराजे आक्रमक; पंतप्रधान मोदींच्या नावाचा उल्लेख करत केली सणसणीत पोस्ट

Vishal Gangurde

मुंबई : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 'छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नसल्याचे म्हणत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक्सवर पोस्ट करत म्हणलं की, ' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला आहे. मुळातच आकारहीन आणि शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा, यासाठी आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार'.

'आता त्याठिकाणी पुन:श्च छत्रपती शिवाजी महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण विधानसभा निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. पुतळा उभारण्यास उशीर होऊदे, पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.

अशा संस्था काळ्या यादीत टाका; सुप्रिया सुळे आक्रमक

'सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला शिवरायांचा पुतळा कोसळला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपवण्यात आले होते. त्याने काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. ही व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे, अशी आमची मागणी आहे, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

माजी खासदार विनायक राऊत यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळल्यानंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे विटंबना ही शासन निर्मित असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. या दुर्घटनेत शिवरायांच्या हवामानात जबाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि इतर अधिकाऱ्यांवर पोलीस फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी पत्रक लिहित केली आहे.

'छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमनाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मधील रवींद्र चव्हाण यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याविषयी तज्ञ्ज मंडळीची समिती तयार करून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री यांना द्यावेत, असं त्यांनी पत्रकात म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IOCL Recruitment: इंडियन ऑइलमध्ये अधिकारी होण्याची संधी; या पदासाठी सुरु आहे भरती; वाचा संपूर्ण माहिती

Nandurbar News : नंदुरबार दंगल..दगडफेक करणाऱ्या ४० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात; शहरात तणावपूर्ण शांतता

Manoj Jarange Patil: उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती खालावली; मनोज जरांगेंचा उपचार घेण्यास नकार

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

SCROLL FOR NEXT