Road Accident saam tv
Video

Former MLA Accident: कार चार-पाच वेळा उलटली, अंगावर पडली; भाजपच्या माजी आमदाराचा अपघाती मृत्यू|VIDEO

Beed News: बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार आर टी देशमुख यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे.

Omkar Sonawane

राज्यातील अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून गेल्या काही दिवसात सातत्याने अपघातांचे वृत्त माध्यमांमध्ये दिसत आहे. आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरील बेलकुंड उड्डाणपूलवरून जात असताना गाडी स्लीप होऊन कठडा तोडून चार वेळा पलटी होऊन भाजपचे माजी आमदार आर टी देशमुख यांचं निधन झालं आहे. अपघातानंतर त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले मात्र लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी फेसबुकवर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली दिली. तसेच मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून लातूर या ठिकाणी पोहोचले आहे. तसेच देशमुख कुटुंबांशी फोनवरून संवादही साधला.

बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांच्या गाडीला लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड येथे अपघात झाला. या अपघातात माजी आमदार आर टी देशमुख हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तात्काळ लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान आर टी देशमुख हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माजलगाव मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर आमदार बनले होते. तसेच ते दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे जवळचे सहकारी म्हणून परिचित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni-Amruta Subhash Video : "बघा आली ही राणी…"; सोनाली कुलकर्णी-अमृता सुभाषच्या कातिल अदा, पाहा 'परिणती'चं नवीन गाणं

Bank Holidays: १५ ऑगस्ट, गणेशोत्सव... ऑगस्टमध्ये अर्धा महिना बँका बंद; वाचा सुट्ट्यांची यादी

Maharashtra Live News Update: पुण्यात नसरापूरमध्ये महिलेला हिप्नॉटाइज करत भरदिवसा सोन्याची लूट

Monsoon Health Tips: तुम्हाला पावसात भिजायला आवडतं का? त्याआधी जाणून घ्या महत्त्वाचे उपाय

Jalna Breaking News : जालन्यात मुसळधार पावसाचा कहर, पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT