Devendra Fadnavis  saam tv
Video

Devendra Fadnavis : मस्ती कराल तर...; फडणवीसांचा इशारा नेमका कुणाला?

Devendra Fadnavis Warns Cabinet Ministers : देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाला थेट इशारा दिलाय. मस्ती कराल, तर घरी जाल, असं ते बोलल्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी सांगितलं.

Saam Tv

राज्याच्या मंत्रिमंडळासंदर्भात मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट सज्जड दम दिला आहे. मस्ती कराल तर घरी जाल, असा इशाराच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळाला दिल्याचं कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी सांगितलं.

मंत्र्यांचे वैयक्तिक सचिव, ओएसडी सुद्धा फडणवीस ठरवतात, असंही कोकाटे म्हणाले. निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला. आता माझ्यासह तुमच्या कुणाच्या जाण्यानं सरकारवर परिणाम होणार नाही. त्यामुळं जास्त मस्ती कराल तर घरी जाल. डिपार्टमेंटचं काम शिस्तीत व्हायला हवं. १०० दिवसांचा कार्यक्रम दिलाय. आमचे पीए, ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्या हातात आता काही राहिलं नाही. त्यामुळं आम्हाला तर नीट काम करावं लागेल. आपणही चांगलं काम कराल. म्हणजे कामाची सांगड बसेल, असंही कोकाटे म्हणाले.

मी कॅबिनेटमध्ये स्पष्ट सांगितलं होतं. तुम्हाला हवी ती नावं पाठवा. त्या नावांत फिक्सर म्हणून किंवा चुकीच्या कामात आहेत, त्यांना मी मान्यता देणार नाही. आतापर्यंत सव्वाशे नावं आली आहेत. १०९ नावांना मी मान्यता दिलीय. उर्वरित नावांना मान्यता दिली नाही. कारण कुठला तरी आरोप, चौकशी सुरू आहे. कुणीही नाराज झालं तरी मी अशांना मान्यता देणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT