ZP Election Saam Tv
Video

ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीत गैरहजर, कामचोर ११९ अधिकाऱ्यांवर गंगापूरमध्ये गुन्हे

FIR against government staff absent in election duty Gangapur case details : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे निवडणूक कामावर गैरहजर राहिल्याप्रकरणी ११९ शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर पोलिसांनी कारवाई केली असून निवडणूक कर्तव्य टाळणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra election commission action against absentee polling staff : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्ती होऊनही गैरहजर राहिलेल्या ११९ शिक्षक, सहशिक्षक, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आयोगाच्या आदेशावरून शनिवारी रात्री गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गट शिक्षणाधिकारी अरविंद यांनी तक्रार दिली. निवडणूक कामासाठी सर्व शासकीय विभाग, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. तसे संबंधितांना आणि प्रमुखांना कळवले जाते. त्यानंतरही जबाबदारी टाळणाऱ्यांवर कारवाईचा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी विजय राऊत यांनी दिला होता. तरीही तब्बल ११९ अधिकारी, कर्मचारी ४ व ६ रोजी आयोजित निवडणूक प्रशिक्षणास आणि निवडणूक कर्तव्यावर गैरहजर राहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT