Father beaten with sticks for resisting daughter's harassment; incident from Yamuna Residency, Jalna – CCTV footage viral saam tv
Video

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Jalna News: जालना शहरातील यमुना रेसिडेन्सीमध्ये मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने वडिलांवर अमानुष हल्ला करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

जालना: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने वडिलांना अमानुष मारहाणीला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना जालना शहराजवळील निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सीमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, हादरून टाकणारी ही घटना आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित व्यक्तीने आपल्या मुलीच्या छेडछाडीला विरोध केला होता. त्याचा राग मनात ठेवत दोन आरोपींनी लाठ्याकाठ्यांनी त्यांच्यावर अमानुष हल्ला केला. हा प्रकार जालना शहरातील यमुना रेसिडेन्सी परिसरात आज घडला.

या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात मारहाण व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT