Dharashiv Flood Girish mahajan visit saam tv
Video

शेतकऱ्यांनी अडवला मंत्री गिरीश महाजनांचा ताफा | VIDEO

Dharashiv flood : धाराशिवमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय. पुरात पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. जनावरं वाहून गेली आहेत. शेतकरी पुरता हतबल झालाय. पूरस्थिती आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. शेतकऱ्यांनी गिरीश महाजनांचा ताफा अडवला.

Nandkumar Joshi

बालाजी सुरवसे, धाराशिव | साम टीव्ही प्रतिनिधी

धाराशिवमध्ये गेल्या दोन दिवसांपासून आभाळ फाटल्यागत पाऊस पडतोय. अनेक तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी बचाव मोहीम राबवण्यात आली होती. शेतीचं नुकसान झालं आहे. पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. जनावरं वाहून गेली आहेत. शेतकरी हतबल झाला आहे. प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून पाहणी करत आहेत. भूम तालुक्यात मंत्री गिरीश महाजन पाहणीसाठी गेले होते.

भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे गावात शेतकऱ्यांची शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. गिरीश महाजन यांना बघून शेतकरी आक्रमक झाले. आमची जनावरं मेली आहेत, तात्काळ मदत द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यांनी मंत्री महाजनांचा ताफा अडवून धरला. त्यावर मी प्रशासनाला तात्काळ मदत करण्यास सांगतो, मी काही पैसे घेऊन आलो नाही, असं गिरीश महाजन म्हणाले. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा आणि तिथं निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती बघून महाजन पुढील गावातील पाहणी न करताच बार्शीकडे रवाना झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT