Women in Maharashtra protest against new rules in ‘Ladki Bahin Yojana’ restricting benefits to two members per family. Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेवरून घराघरात ‘महाभारत’; सासू–सुना, जावा–जावा आमनेसामने | VIDEO

Only Two Women Per Family Eligible for ‘Ladki Bahin Yojana’: लाडकी बहीण योजनेतील नव्या अटींमुळे घराघरात वादाची ठिणगी पेटली आहे. दोनपेक्षा अधिक महिलांना लाभ अपात्र ठरविण्याच्या निर्णयामुळे सासू–सुना आणि जावा–जावा आमनेसामने आल्या आहेत.

Omkar Sonawane

लाडकी बहीण योजनेत सरकारने नवे पात्रता निकष लागू केले आहेत.

एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळणार नाही.

नव्या अटींमुळे अनेक कुटुंबांत सासू–सुना, जावा–जावा यांच्यात वाद सुरु झाले आहेत.

हजारो महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता असल्याने तणाव वाढला आहे.

राज्यातील महिलांसाठी सुरू असलेली ‘लाडकी बहीण योजना’ आता वादाचा विषय ठरत आहे. शासनाने या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नवे नियम लागू केले असून, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना अपात्र ठरवले जाणार आहे.

या निर्णयानंतर अनेक घरांमध्ये सासू–सुना, जावा–जावा आणि इतर महिला सदस्यांमध्ये वाद निर्माण झाले आहेत. महिन्याला मिळणाऱ्या १,५०० रुपयांच्या हक्कासाठी आता घराघरात वाद रंगू लागले आहेत.

शासनाच्या नव्या अटींमुळे हजारो महिलांचा या योजनेतून पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेतून महिलांना आर्थिक मदत करण्याचा उद्देश असला, तरी नव्या निर्णयामुळे अनेक कुटुंबांत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budget Plan: जिओनंतर 'या' कंपनीने दिला धक्का! लोकप्रिय आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन आता बंद

Zodiac signs' fate: ललिता पंचमीमुळे आजचे योग शुभ, जाणून घ्या कोणत्या राशींवर लाभ

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

SCROLL FOR NEXT