gujrat news  saam tv
Video

Nandurbar News: गुजरातमधून महाराष्ट्रात बोगस बियाण्यांची विक्री,अखेर रॅकेटला रंगेहाथ पकडलं; महाराष्ट्र पोलिसांची धडक कारवाई|VIDEO

HTBT Cotton Seed Scam: नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत खरीप हंगामापूर्वी एकूण 5 कारवाया करण्यात आल्या असून त्यामध्ये 12 लाख 5 हजार रुपयांचे बोगस बियाणे देखील जप्त करण्यात आलेले आहे.

Omkar Sonawane

सागर निकवाडे, साम टीव्ही

नंदुरबार: गेल्या काही वर्षांपासून गुजरात राज्यात तयार केले जाणारे बोगस बियाणे महाराष्ट्रात विकले जात असल्याचं धक्कादायक प्रकरण वारंवार समोर येत आहे. यातच गुजरात राज्यात तयार केलेले बोगस बियाणे हे महाराष्ट्राच्या सीमावरती भाग असलेल्या निझर या गुजरात राज्यातील गावात साठवणूक केली जाते आणि त्यानंतर अवैद्य मार्गाने महाराष्ट्रात त्याची विक्री केली जात असते. महाराष्ट्र आणि गुजरात सीमेजवळ असलेल्या अक्कलकुवा बस स्थानकावर गुप्त माहितीच्या आधारावर एका गुजरात राज्य परिवहन विभागाच्या बसची तपासणी करत अवैधरिता एचटीबीटी कापूस या कापूस बियाण्याची जप्ती नंदुरबार कृषी विभागाने केली आहे.

गुजरात राज्यातून महाराष्ट्रात बोगस बियाणे तस्करी करणाऱ्या दोघांविरोधात कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एचटीबीटी कापूस नामक कंपनीचे कापसाचे बोगस बियाणे कृषी विभागाने जप्त केली आहे गुजरात राज्याच्या परिवहन बसणे ही तस्करी केली जात होती त्यानंतरच कृषी विभागाने पथकाने काही कारवाई करत दीड लाख रुपयांचा बोगस बियाणे जप्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्याचं दुर्दैव आहे, शासन व प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही - यशोमती ठाकूर

गाडीचं तिकीट मिळालं नाही? चिंता सोडा! कोकणात जाणाऱ्यांसाठी ३४ स्पेशल गाड्या; वेळापत्रक पाहाच

Vanilla Ice Cream: बाजारातील आईस्क्रीम विसरा, घरी बनवा क्रीमी आणि स्वादिष्ट व्हॅनिला आईस्क्रीम; वाचा रेसिपी

Pune : भीषण स्फोटाने खळबळ! पिंपरी-चिंचवड शहराचा वीजपुरवठा खंडित; पाहा नक्की काय घडलं

राजधानीत थरारक घटना! 5 मजली इमारत कोसळली; 50 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली

SCROLL FOR NEXT