Expired medicines discovered at a primary health centre in Latur raise concerns over patient safety and healthcare negligence. saam tv
Video

आरोग्य केंद्रात रुग्णांना कालबाह्य औषधांचा पुरवठा? सरकारी रुग्णालयांचा भोंगळ कारभार|VIDEO

Expired Medicines In Nilanga Primary Health Centre Latur: लातूरच्या निलंगा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कालबाह्य औषधांचा साठा आढळल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप होत असून तात्काळ कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Omkar Sonawane

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या आरोग्य केंद्रात कालबाह्य औषधांचा साठा आणि मुदत संपलेली वैद्यकीय साहित्य आढळून आल्याने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात एक्सपायरी डेट संपलेली औषधे साठवून ठेवण्यात आली होती. यामुळे ही औषधे रुग्णांना दिली जात होती का? असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात सरकारी आरोग्य सेवांवर अवलंबून असतात.

अशा परिस्थितीत जर आरोग्य केंद्रातच निष्काळजीपणा होत असेल, तर रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

एकत्र प्रवास, शिंदेसेना अस्वस्थ? ठाकरेंची उच्चस्तरीय चर्चेची गुगली

SCROLL FOR NEXT