Salil Deshmukh News SaamTv
Video

Assembly Election : सलील देशमुख विधानसभा लढवणार? पाहा Video

Saam Tv

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. उमेदवारीसाठी त्यांनी शरद पवार यांच्यासमोर रविवारी मुलाखत देखील दिली आहे. विदर्भातून कुठल्याही मतदारसंघातून त्यांची निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं सलील देशमुख यांनी म्हंटलं आहे.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यांच्या मुलाखती होणार असून रविवारी पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात आज विदर्भातील 12 जिल्ह्यांसाठीच्या जागांवर इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. स्वत: शरद पवार यांनी या मुलाखती घेतल्या आहेत. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी देखील मुलाखत दिली आहे.

'मी अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेचं काम करत आहे. त्यामुळे मी विधानसभेसाठी अर्ज टाकला आहे. मात्र मला पक्ष आदेश देईल, संधी देईल त्या प्रकारे मी पुढील काम करेल.'' असं सलील यांनी म्हंटलं आहे. मात्र आपण मुलाखत द्यायला आलोय का, याबद्दल त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पक्षश्रेष्ठींनी बोलावल तर जाईल, असं त्यांनी याबद्दल बोलताना म्हंटल आहे. आज सर्वच पक्षातील उमेदवार शरद पवार यांच्या गटातून लढण्यास इच्छुक आहेत. आगामी काळात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा विजय नक्की होईल असंही त्यांनी म्हंटल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सद्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गुलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

SCROLL FOR NEXT