Dharashiv Protest Against EVM saam tv
Video

जिल्हा परिषद निवडणुकीआधी EVM मुद्दा पेटला, धाराशिवमध्ये महामार्गावर टायर पेटवले, VIDEO

dharashiv evm protest ahead of zilla parishad elections: जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांआधी ईव्हीएमचा मुद्दा पेटला असून, बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये आंदोलन झालं.

Nandkumar Joshi

बालाजी सुरवसे, धाराशिव, साम टीव्ही

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होत आहेत. या निवडणुकांआधी ईव्हीएमच्या मुद्द्यानं पेट घेतला आहे. ईव्हीएमविरोधात धाराशिवमध्ये तरुणांनी आंदोलन केलं आहे. सोलापूर-धुळे महामार्गावर टायर पेटवण्यात आले. धाराशिवच्या चोराखळीत तरुणांनी हे आंदोलन केलं. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली.

ईव्हीएम हटवण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तरुण वर्ग आक्रमक झाला आहे. धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तरुण रस्त्यावर उतरले आहेत. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील तांदळवाडी येथे ईव्हीएमविरोधात उपोषण सुरू आहे. बाळराजे आवारे पाटील यांच्याकडून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला तर निवडणूक आयोग जबाबदार असेल, असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भाजपचा वॉच, नगरसेवकांचे फोन टॅप'; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Maval Politics: फॉर्म भरण्याच्या दिवशीच मावळात हाय व्होल्टेज ड्रामा; राष्ट्रवादी-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भाजप शिंदेसेनेविरोधात पोलिसात जाणार, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Fact check: कर्ज देणारा करोडपती भिकारी...; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra Politics: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का? अजित पवारांच्या गटातील बड्या नेत्याचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT