ED raids in Mumbai and other cities, seizing cash, gold, and freezing bank accounts linked to ISIS operatives. Saam Tv
Video

ED चे राज्यात 40 ठिकाणी छापे, इतकी मालमत्ता जप्त, दहशतवाद्यांशी संबंध ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले|VIDEO

ED Raids Against ISIS In India: डायरेक्टोरेट ऑफ एनफोर्समेंट (ED) ने ११ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई, दिल्ली, कोलकाता, हजारीबाग, प्रयागराज, दमण व रत्नागिरीसह ४० ठिकाणी छापे मारून रु. ९.७० कोटींच्या चल-अचल मालमत्ता जप्त केल्या.

Omkar Sonawane

गणेश कवडे, साम टीव्ही

मुंबई झोनल ऑफिसच्या डायरेक्टोरेट ऑफ एनफोर्समेंट (ED) ने ११ डिसेंबर २०२५ रोजी PMLA (Prevention of Money Laundering Act), 2002 अंतर्गत मुंबईच्या पाडघा-बोरीवली परिसरासह दिल्ली, कोलकाता, हजारीबाग, प्रयागराज, दमण व रत्नागिरीसह ४० ठिकाणी छापेमारी केली. ही छापेमारी साकिब नचन आणि इतरांशी संबंधित अत्यंत कट्टर ISIS दहशतवादीविरुद्ध सुरू असलेल्या तपासाचा भाग होती.

छापेमारी दरम्यान रु. ९.७० कोटींच्या चल-अचल मालमत्तेची जप्ती करण्यात आली आहे. यात रोख रक्कम ३.७० कोटी आणि ६ कोटीचे सोन्याचे दागिने जप्त केली गेली. तसेच, संशयितांशी संबंधित २५ बँक खाते गोठवण्यात आले आहेत. विविध आरोपपत्र, कट्टरपंथी साहित्य, डिजिटल साधने आणि इतर पुरावेही जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे देशात राहून दहशतवादी संघटनेशी संबंध ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, संजय राऊतांच मोठं वक्तव्य; राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: पुण्यात खड्ड्यावरून शिवसेना आक्रमक, शिंदे गट करणार खड्ड्यांचा पंचनामा

कमी झोप, जास्त साखर खाणे आणि सतत मोबाईल पाहणे; रोजच्या 'या' 10 सवयी मेंदू अन् स्मरणशक्तीसाठी ठरतात घातक

ड्रग्ज तस्कराच्या मुसक्या आवळल्या; मुंबई पोलिसांच्या कारवाईत तब्बल ९ लाखांचा MD जप्त

Kisan Credit Card : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! KCC मधून मिळणार तब्बल ₹5 लाखांपर्यंत कर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT