Rohit Pawar consoles Class 8 student Seema Thutte after her emotional speech on farmer's struggles in Beed. Saam Tv
Video

वही आणायला १० रुपये मागितले तर पप्पा...; शेतकऱ्याच्या लेकीची व्यथा, रोहित पवारही भावूक, पाहा, VIDEO

Rohit Pawar Emotional: शेतकरी कुटुंबातील आठवीत शिकणाऱ्या सीमाने आमदार रोहित पवारांसमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. तिचं भाषण ऐकून रोहित पवार भावूक झाले आणि तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.

Omkar Sonawane

आमदार रोहित पवार यांच्यासमोर इयत्ता ८ वीमध्ये शिकणाऱ्या सीमा थुट्टे या मुलीने शेतकऱ्याच्या समस्या मांडल्या. शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर सरकारला जाग येत का, म्हणत शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते, मीठ असते तर तेल नसते, सोयाबीनला भाव तीन चार हजार रुपये आणि तेलाचे भाव ११५ रूपये, शेतकऱ्यांना काय पुरते. शाळेत वही आणायला दहा रुपये जरी मागितले तर पप्पा म्हणतात खिशात दहा रुपये नाही.

लाडकी बहिण योजनेचे १५०० नाही दिले तरी चालतील पण शेतीच्या मालाला भाव द्या, अशाप्रकारे सीमा थुट्टे या मुलीने रोहित पवारांना समस्या सांगत असताना भावूक झाली. दरम्यान या व्यथा सांगत असताना ही मुलगी भावुक झाली होती. यावेळी रोहित पवारने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरविला आणि शांत केले. रोहित पवार म्हणाले, मी आज विरोधी पक्षात आहे. जर मी हा निर्णय घेतला असता तर आज मी मंत्री झालो असतो म्हणाले यावेळी त्या मुलीचा आक्रमकपना पाहून रोहित पवारांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. आमदार रोहित पवार हे भरोसा येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याचे कुटुंबाला सांत्वनापर भेटीसाठी आले असताना रोहित पवार परत जाताना तीन चार मुलींनी त्यांना रस्त्यात अडविले आणि संवाद साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT