छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' म्हणून या संघटनेला भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. ही आनंदवार्ता संभाजीराजे छत्रपतींनी सोशल मीडियावर आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत सर्वांसोबत शेअर केली आहे. आता 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' आगामी विधानसभा निवडणुक देखील लढवणार असल्याचं बोललं जात आहे. ही निवडणूक लढवण्यासाठी त्यांना सप्त किरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे.
आगामी विधानसभेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तिसऱ्या आघाडीत राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्यासोबत संभाजीराजे छत्रपतींचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता या दोन्ही पक्षांसोबत आता संभाजीराजे छत्रपतींचा पक्ष देखील पूर्ण ताकदीने लढताना बघायला मिळण्याची चिन्ह आहेत. यासंदर्भात संभाजीराजे छत्रपतींनी केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आनंदवार्ता…! स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की, ९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली 'स्वराज्य संघटना' आता भारतीय निवडणूक आयोगाकडे 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' म्हणून ओळखला जाईल.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.