CIDCO Home Saam Tv
Video

CIDCO Home : सिडको घरांच्या किंमती कमी होण्याची शक्यता, एकनाथ शिंदे महत्त्वाचे निर्णय घेणार?

CIDCO Housing Prices : सिडको घरांच्या किंमती कमी करण्याबाबत आज नगरविकास विभागाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Namdeo Kumbhar

DCM Shinde Meeting On Cidco home Price : सिडको घरांच्या किंमती कमी करण्याबाबत आज महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.सिडको महामंडळाने बांधलेल्या सदनिकांच्या किंमती आणि इतर बाबींवर निर्णय घेण्यासाठी नगरविकास विभागाची आज बैठक होणार आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित असतील. आजच्या बैठकीत सिडकोच्या घरांच्या किंमतीचा निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात येतेय.(CIDCO housing price reduction meeting details)

विधानसभा कामकाज सल्लागार समिती कक्षामध्ये होणार्‍या या बैठकीत सोडतीत न सुटलेल्या तसंच प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांतील घरांच्या किंमतींबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या निर्णयामुळे विविध उत्पन्न गटांतील नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध होण्यास मदत होईल. एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागेलय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Untitled May 06, 2026 02:29 am

SRPFच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेचा घोटाळा? खासगी क्लासच्य़ा संचातले 100 पैकी 85 प्रश्न

पुणे पुन्हा हादरलं! ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न? नागरिक आक्रमक, घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त

नसरापूरच्या नराधमाचं क्रौर्य, बालिकेच्या तोंडात मोजा, अंगावर जखमा, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती

Wednesday Horoscope : धनलाभ होणार, वादापासून दूर राहावे लागेल; ५ राशींच्या लागणार बंपर लॉटरी

SCROLL FOR NEXT