Kalyan Dombivali GOOGLE
Video

Kalyan - Dombivali : कल्याण-डोंबिवलीतील वादावर पडदा पडणार? एकनाथ शिंदे - रवींद्र चव्हाण येणार एकाच मंचावर| VIDEO

Eknath Shinde - Ravindra Chavan : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज डोंबिवलीत एकाच मंचावर येणार आहेत. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत दोन्ही नेत्यांची नावे असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज डोंबिवलीत एकाच मंचावर येणार आहेत. केडीएमसीच्या सावळाराम क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आणि सावित्रीबाई नाट्यगृहाच्या नूतनीकरण सोहळ्यानिमित्त हे दोन्ही नेते एकत्र दिसणार आहेत. या कार्यक्रमासाठी उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थित राहणार आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीदरम्यान या दोन नेत्यांमध्ये पक्षप्रवेशावरून वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर आजच्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती आणि देहबोली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत दोन्ही नेत्यांची नावे असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नायलॉन मांजाने तीन वर्षीय मुलाचा गळा कापला

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी आणि पोलिसांत शाब्दिक बाचाबाची|VIDEO

Devendra Fadnavis : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली डेडलाईन

Prajakta Gaikwad New Video: लग्नानंतर प्राजक्ताचा पारंपारिक पद्धतीने चुडा उतरवण्याचा कार्यक्रम; व्हिडीओ पाहून होतय सौंदर्याचं कौतुक

Horoscope: जुळून येती रेशीमगाठी!नात्यातील अडचणी होतील दूर; 'या' राशींसाठी आहे आनंदाचा दिवस

SCROLL FOR NEXT