Deputy CM Eknath Shinde addresses the Assembly amid major portfolio changes during the Maharashtra Budget Session Saam Tv
Video

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदेंचा महत्वाचा निर्णय; 3 खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे|VIDEO

Political Impact Of Shinde Decision In Maharashtra Assembly: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्त्वाची खाती इतर मंत्र्यांकडे सोपवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. येत्या 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा धक्का देत निर्णय घेतला आहे.

अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांना तसे पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी दादा भुसे यांच्यावर सोपवण्यात आली. तर गृहनिर्माण विभागाची जबाबदारी मंत्री शंभुराज देसाई आणि नगरविकास खाते उदय सामंत यांच्यावर आहे. अधिवेशन काळात एकनाथ शिंदे यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diva Junction : 'दिवा जंक्शन'जवळील ५ मनमोहक पर्यटन स्थळे, पावसाळ्यात फॅमिली ट्रिप प्लान कराच

Maharashtra News Live Update : वाळूज औद्योगिक परिसरातील प्लास्टिक स्क्रॅपला आग; मोठा अनर्थ टळला

Singer Death : हवेत दोन हेलिकॉप्टरची टक्कर; प्रसिद्ध गायकाचा अपघातात मृत्यू, संगीत विश्वावर शोककळा

Weak heart signs: त्वचेवर ही 5 लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Water Crisis : पुणेकरांवर पाणीसंकट! 'या' भागात आजपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार; वाचा संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT