Eknath Shinde Exclusive SaamTv
Video

Eknath Shinde : प्रश्न सोडवायला महायुती भक्कम आहे; दरेगावातून एकनाथ शिंदे Exclusive, पाहा Video

Eknath Shinde Exclusive : पालकमंत्रिपदावरून महायुतीत वाद सुरू आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दरेगावात असल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहे. त्यावर आज स्वत: एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

Saam Tv

नाराजी बाबत कोण काय बोलतोय हे तुम्हीच दाखवत आहात आणि आता तुम्हीच इथे बघत आहात मी इथे कामात आहे. महायुतीच्या नाराजीबाबत तुम्हाला का प्रश्न पडतात? तुम्हाला जे प्रश्न होते तिकीट वाटपापासून मंत्रिमंडळापर्यंत ते सर्व प्रश्न सुटत गेले आहेत. महायुती भक्कम आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महायुतीत सध्या पालकमंत्रिपदावरून वाद सुरू आहे. त्याच अनुषंगाने रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आलेली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही त्यांच्या मूळ गावी दरेगाव येथे गेलेले असल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आज दरेगाव येथून साम टीव्हीला एक्सकल्यूझिव मुलाखत देत याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, गोगावले यांनी अपेक्षा करणे किंवा मागणी करणे यात काही चुकीचं नाही. शेवटी त्यांनी रायगडमध्ये अनेक वर्ष काम केलं आहे. मी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही सर्व बसून यावर मार्ग काढू. नवीन महाबळेश्वरच्या मोठ्या प्रोजेक्टचा मी मागे लागलेलो आहे. हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि यासाठी मला गावी यावं लागेल आणि मी गावी आलो की लोक म्हणतात मी नाराज आहे. आतापर्यंत २३५ गाव या प्रोजेक्टच्या अंतर्गत येत आहे. आणि अजून २९५ गावांनी मागणी केली आहे. मोठ्या प्रमाणावर सातारा जिल्हा हा पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल आणि त्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत ते मला करावे लागतील. रायगड आणि नाशिकचा बाबत लवकरच मार्ग निघेल. तुम्हाला जेवढ्या चिंता आहेत त्या सगळ्यावर लवकरच मार्ग निघेल निर्णय होईल. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना सांगितलं आहे, जिथे जिथे पर्यटनाला चालना देता येईल तिथं जाऊन भेट द्या काही ठिकाणी आम्ही स्वतः देऊ या भागाचा विकास करणे आणि कायापालट करून लोकांच्या जीवनात अमलाग्र बदल घडवून हा आमचा उद्देश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT