Shivsena Shinde Group SaamTv
Video

Shivsena : दिल्लीत जाण्याआधी आज वर्षावर बैठक; शिवसेना आमदारांची धाकधूक वाढली!

Shivsena Shinde Group : मंत्रिमंडळात शिवसेनेच्या ४ नव्या आमदांराची वर्णी लागण्याची शक्यता असल्याने जुन्या आमदारांना डच्चू मिळू शकतो. त्यासंदर्भात आज शिवसेनेच्या सर्व आमदारांची महत्वाची बैठक पार पडणार आहे.

Saam Tv

शिवसेनेतील काही आमदारांची धाकधूक वाढली आहे. नव्या मंत्रिमंडळात ४ नव्या आमदांराची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर चार मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. आज वर्षा बंगल्यावर सर्व शिवसेना आमदारांची बैठक होणार आहे. दिल्लीला जाण्याआधी ही बैठक महत्वाची मनाली जातेय. त्यामुळे आता यात कोणत्या चार आमदारांना डच्चू मिळेल हे पहाणं महत्वाचं ठरेल. कारण नव्या चार चेहऱ्यांना या मंत्री मंडळात संधी मिळेलं असं बोललं जात आहे. हे नवीन चेहरे कोण याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे शिवसेनेतील काही आमदारांची धाकधूक वाढली आहे. मंत्री मंडळासाठी याआधी देखील काही आमदारांची नावं चर्चेत होती. मात्र आता मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जुन्या आमदारांना डच्चू मिळणार आहे. आता हे नवीन चेहरे कोण असतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI New Rules : UPI युजर्सला मोठा धक्का, ५ हजारांपेक्षा जास्त पाठवल्यास चार्ज लागणार; जाणून घ्या सरकारचा नवा नियम

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

SCROLL FOR NEXT