Eknath Shinde interacting with flood-affected farmers, assuring full government support for recovery and relief efforts. Saam Tv
Video

Eknath Shinde: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही; एकनाथ शिंदे यांचं आश्वासन|VIDEO

Pandharpur Ration Black: महाराष्ट्रातील अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे की सरकार त्यांना अटी-शर्ती न ठेवता मदत करणार आहे.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यात जी अतिवृष्टी झालेली आहे. त्यावर संवाद साधला. शिंदे म्हणाले, राज्यात पूरपरिस्थिती झालेली आहे. ज्या ठिकाणी पूरस्थिती आहे, त्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत. पूरस्थिती आणि संकट शेतकऱ्यावरचं खूप मोठं आहे. शेतकरी देखील बोलताना त्याच्या वेदना जाणवत होत्या. आणि ते माहिती देत होते की गेल्या अनेक वर्षांत अशा प्रकारचा ढगफुटीसारखा पाऊस कधी पडला नाही. संकट मोठं आहे. अशा स्थितीत शेतकऱ्याच्या मागे सरकार खंबीर आहे.

म्हणून आज देखील कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली. संकट मोठं आहे. त्याच दृष्टीकोनातून शेतकऱ्याला मदत देताना सरकार हात अखडता घेणार नाही. पंचनाम्याची माहिती घेत आहे. ६० लाख हेक्टर पिकाचं नुकसान झालं आहे. दोन तीन दिवसांत नुकसानीचं प्रमाण आणि आकडे येतील. एकंदरीत सर्वांचीच भावना आहे की शेतकऱ्याला मदत करताना अटी शर्ती नियम बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे. आणि जेव्हा असं मोठं अतिवृष्टी होते, संकट येतं त्या वेळी सरकारनं मदत करणं ही सरकारची जबाबदारी आहे. कर्तव्य आहे. दोन तीन दिवसांतच मुक्यमंत्री मी आणि अजितदादा त्यावर चर्चा करून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊ.

अटी शर्ती आहेत , यापूर्वीदेखील अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. हे संकट आणखी मोठं आहे. पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. जमीन खरडून गेली आहे. पशूधनाचं नुकसान झालं आहे, घराची पडझड झाली आहे. जीवीतहानी झाली आहे. पाऊस थांबला असेल तरी नदीचा प्रवाहामुळे आतापर्यंत काही घरं पाण्याखाली आहेत. त्यांना मदत करत असताना सरकार हात अखडता घेणार नाही. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. अशा परिस्थितीत यामध्ये आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन दिलं. देवेंद्र आणि मी होतो. त्याचबरोबर आमच्या तिघांच्या सह्यांचं पत्र देखील पंतप्रधानांना दिलं आहे. अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्यानं आणल्या आहेत.

राज्य आणि केंद्र पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आहे. मंत्र्‍यांच्या देखील भावना देखील अशाच संवेदनशील होत्या. यांना मदत करणे आपल्.ा सगळ्यांचं कर्तव्य आहे. सरकार मदत करणार, शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणार. प्रत्यक्ष बांधावर जाऊन, शेतकऱ्यांच्या घरांची परिस्थिती पाहिली. त्यांना तात्काळ जीवनावश्यक वस्तू देण्याची आवश्यकता आहे. सरकारनं देखील १० हजार रुपये देण्याची सुरुवात केली आहे. गहू , तांदूळ दिले जात आहेत. सगळ्यांनी एकत्र येऊन राजकारण करण्याची आवश्यकता नाही. वह्यापुस्तके, कपडे, भिजले आहेत. म्हणून आम्ही जी काही मदत गेल्या आठवड्यापासून तिकडे पाठवण्याची सुरुवात केली आहे. त्या त्या भागात पदाधिकारी, कार्यकर्ते वाटप करत आहेत.

शेवटच्या शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ती चालू राहिल. साथीचे आजार पसरू नयेत यासाठी यंत्रणा लावली आहे. आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मेडिकल कॅम्प मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येत आहे. डॉक्टरांची टीम देखील पोहोचली आहे. आरोग्य विभागाची देखील टीम आहे. खासगी हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत. ते योगदान देत आहेत. असे एकनाथ शिंदे यांनी बोलताना नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chennai Shocked : थर्मल पॉवर प्लांटमध्ये मचान कोसळला, ९ मजुरांचा जागीच मृत्यू, चेन्नईत घडली दुर्घटना

Shocking: 'सर्वांची आई मरते, नाटक करू नको कामावर ये', सुट्टी मागणाऱ्या कर्मचाऱ्यावर बॉस भडकला, ई-मेलचे फोटो व्हायरल

तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचे मंगळसूत्र मी चोरले; गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली|VIDEO

Maharashtra Live News Update:पुणे नाशिक महामार्गावरील भिमा नदीच्या पुलावर भिषण अपघात

Mumbai Accident : मुंबई हादरली! आधी महिलेवर अत्याचार केला, नंतर गळा आवळून संपवलं

SCROLL FOR NEXT