Six MPs join Eknath Shinde-led Shiv Sena, set to contest future elections on the party’s bow and arrow symbol. saam tv
Video

एकनाथ शिंदेंनी टाकला मोठा डाव; 2029 साठी उमेदवार जाहीर|VIDEO

Eknath Shinde Announces Candidates For 2029 Lok Sabha Elections: एकनाथ शिंदे यांनी 2029 लोकसभा निवडणुकीसाठी मोठी घोषणा केली असून, शिंदे गटात सामील झालेले सहा खासदार धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवणार आहेत.

Omkar Sonawane

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले सर्व 6 खासदार आगामी लोकसभा निवडणूक शिवसेनेच्याच म्हणजे धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढतील आणि पुन्हा महायुतीचे खासदार म्हणून निवडून येतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीय. बंडखोर 6 खासदारांपैकी काही खासदार हे 2024 च्या निवडणुकीत शिंदेंच्याच उमेदवारांविरोधात, तर काही जण भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव करून संसदेत पोहोचले होते. हे खासदार आता शिंदे गटात आल्यामुळे, आगामी लोकसभा निवडणुकीत या जागांवर हक्क कोणाचा? भाजप आणि राष्ट्रवादी आपल्या हक्काच्या जागा शिवसेनेला सोडणार का? असे प्रश्न उपस्थित झालेत. या पक्षप्रवेश सोहळ्यात परभणीचे तीन वेळा निवडून आलेले खासदार संजय (बंडू) जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT