Video

जमीन थरथरली, लोक घाबरून घराबाहेर पळाले; शहराला बसले भूकंपाचे सौम्य धक्के

earthquake in assam : आसाम राज्यातील अनेक जिल्ह्याला भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांची पळापळ झाली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे सांगण्यात आलं आहे.

Vishal Gangurde

आसामच्या अनेक जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. अनेक भागात जवळपास रात्री ९.१० वाजता ४.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरून घरातून बाहेर पळाले. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही. काही दिवसांपूर्वी देखील आसाममध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते .

काही दिवसांपूर्वी, आसाम, मेघालय आणि ईशान्य भागातील राज्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.भूटानमध्ये झालेल्याची भूकंपाची तीव्रता ही ५.७ रिश्टर स्केल इतकी होती. तर आज गुरुवारी झालेल्या भूकंपाचा केंद्र हा आसामपासून २५२ किलोमीटर दूर इतका होता. आजच्या भूकंपाचे अनेक भागात धक्के जाणवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT