CCTV footage captures MNS leader Laxman Jadhav brutally attacking a junior doctor inside ICU of Mehkar’s Gabhane Hospital.  Saam Tv
Video

MNS News: मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाची गुंडगिरी; रुग्णालयात ज्युनिअर डॉक्टरवर जीवघेणा हल्ला|VIDEO

Junior Doctor Assaulted By MNS Leader: मनसेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी मद्यधुंद अवस्थेत मेहकरमधील खासगी रुग्णालयात जूनियर डॉक्टरला मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुलढाणा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव याने आपल्या मित्रांसह मध्यरात्री तीन वाजता मेहकर येथील गाभणे हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयातील जूनियर डॉक्टरला बेदम मारहाण केली. मनसेचा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव हा मद्यधुंद अवस्थेत रात्री अडीच वाजता गाभणे हॉस्पिटल येथील अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या त्याच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी गेला. मात्र, त्यावेळी तेथील डॉक्टरने मध्यरात्री रुग्णाला भेटण्याची वेळ नसते, रुग्णांना आरामाची गरज असते.

त्यामुळे तुम्ही एकएक व्यक्ती जाऊन भेटून येऊ शकता असे सांगितलं. मात्र लक्ष्मण जाधव यांनी आम्हाला सर्वांना एकाच वेळी आयसीयू मध्ये जाऊदे असं म्हणत आयसीयूमधील कार्यरत ज्युनिअर डॉक्टरला जबर मारहाण केली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी आत्ताच मेहकर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव याने जुनियर डॉक्टरला मारहाण केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT