राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसमधील कंडक्टरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बसमधील कंडक्टर दारूच्या नशेत असल्याचे त्यात दिसते. बोईसर-नाशिक बसमधील हा व्हिडिओ आहे. दारूच्या नशेत असलेल्या कंडक्टरला व्यवस्थित उभंही राहता येत नाही. ड्रायव्हरच्या केबिनजवळ हा कंडक्टर जाऊन काहीतरी बडबड करत होता. धावत्या बसमध्येच हा प्रकार घडला.
मद्यधुंद कंडक्टर तर एकदा ड्रायव्हरच्याही अंगावर गेला. त्याचा तोल जात असल्यानं ड्रायव्हर संतापला. या ड्रायव्हरने बस थांबवून कंडक्टरच्या कानाखालीही मारल्याचं त्यात दिसतं. ड्रायव्हर त्याला आधी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्याला मागे जागेवर जाऊन बस असं वारंवार सांगत होता. पण झिंगाट असलेल्या कंडक्टरला काहीच समजत नव्हतं. अखेर ड्रायव्हरचा पारा चढला. बसमधील काही प्रवाशांनी दारू प्यायलेल्या या तर्राट कंडक्टरचा व्हिडिओ मोबाइलमधून शूट केला. आता हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.