Chandrapur VIDEO: चालकाला आला आकडीचा झटका Saam TV
Video

Chandrapur VIDEO: चालकाला आला आकडीचा झटका, एसटी बस शिरली थेट गॅरेजमध्ये

Chandrapur Accident News: ब्रम्हपुरीहुन चंद्रपूरला जाणारी एसटी महामंडळाची बस गॅरेजमध्ये शिरली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंद्रपूर शहरातील सिंदेवाही शहरात बस थेट गॅरेजमध्ये घुसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नागपूर महामार्गावरील पेट्रोल पंपजवळ शंकर मिस्त्री यांच्या गॅरेजमध्ये थेट एसटी महामंडळाची बस शिरली. ब्रम्हपुरीहुन चंद्रपूरला जाणारी ही शेवटची बस होती. चालकाला आकडीचा झटका आल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले, यात 8 प्रवासी जखमी झाले आहेत. ब्रह्मपुरी ते चंद्रपूर जाणारी ही शेवटची बस सचिन कुळमेथे चालवीत होते. अपघातातील एसटी बसची धडक इतकी जोरदार होती की, यात दोन दुचाकी वाहन, एक ट्रॅक्टर व दोन ते तीन चारचाकी वाहनांची मोडतोड झाली. बसमधील प्रवाशांनी स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. जखमी प्रवाशांना ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलीसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वकीलानं महिलेला ओढलं अन् किस करत.. हाय कोर्टाच्या व्हर्च्यूअल सुनावणीमध्ये काय घडलं? VIDEO व्हायरल

Gold Rate Today : धनत्रयोदशीआधी सोन्याची दिवाळी, एक तोळा सोन्याची किंमत १.२८ लाख

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Home Lottery: BMC कडून ४२६ घरांसाठी लॉटरी, लोकेशन कुठे अन् किंमती किती? वाचा एका क्लिकवर

Shivali Parab : "वेड तुझे..."; शिवाली परबचा 'तो' VIDEO पाहून बॉलिवूड अभिनेत्यानं केलं कौतुक

SCROLL FOR NEXT