Divya Deshmukh Devendra Fadnavis x
Video

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

Divya Deshmukh Devendra Fadnavis : नागपूरच्या दिव्या देशमुखने महिला बुद्धिबळ विश्वचषकावर नाव कोरले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला आणि तिचे अभिनंदन केले.

Yash Shirke

FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामन्यामध्ये नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने विजेतेपद कमावले आहे. तिच्या या यशामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारताची मान गौरवाने उंचावली आहे. तिने कोनेरू हंपी यांना पराभूत करुन बुद्धिबळ चषकावर नाव कोरले आहे. दोन सामने अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या टायब्रेकर सामन्यात दिव्याने हंपी यांचा पराभव केला. १९ व्या वर्षी ती ग्रँडमास्टर बनली आहे.

दिव्या देशमुखच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचे अभिनंदन केले आहे. विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीसाठी तमाम महाराष्ट्राच्या वतीने दिव्या देशमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी दिव्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

'महिला विश्वचषक स्पर्धेत केवळ दुसऱ्याच प्रयत्नात दिव्या देशमुख यांनी उल्लेखनीय भारतीय विक्रम नोंदवला आहे. त्या महिला बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या पहिल्या किशोरवयीन बुद्धिबळपटू ठरल्या आहेत. आता भारताच्या चौथ्या महिला ग्रँडमास्टर म्हणून त्यांची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी आजवर भारताचे ४० वेळा प्रतिनिधित्व केले असून, त्यापैकी ३५ वेळा पदकांची कमाई करत त्यांनी देशाचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडवरून नगरला फक्त ४० रूपयात, रेल्वे कोणकोणत्या स्थानकात थांबणार? वाचा सविस्तर

Mumbai Accident: अभिनेत्री मानसी नाईकच्या EX पतीचा भीषण अपघात; Video viral

पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

SCROLL FOR NEXT