Maharashtra Politics Saam Tv
Video

Maharashtra Politics: जागावाटपात शिंदेंची तडजोड नाही? सर्व्हेविरोधात एल्गार? दिल्लीवारीतून जागांचा तिढा सुटणार?

CM Eknath Shinde: एकीकडे मविआतील जागावाटपाचा घोळ चर्चेत असताना दुसरीकडे महायुतीतही जागावाटपाचं भिजत घोंगडं कायम आहे. महायुतीत जागावाटपात भाजपनं आधीच कुरघोडी केल्यानं शिंदे आणि अजितदादांची कोंडी झाली होती.

Tanmay Tillu

महायुतीची दिल्लीत बैठक होतेय. या बैठकीत फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होईल अशी शक्यता आहे. महायुतीने आत्तापर्यंत 182 जागा जाहीर केल्या तरी दिल्लीत बैठक का असा सवाल उपस्थित केला जातोय. लोकसभेप्रमाणेच यावेळीही भाजपचा अधिक जागांचा अट्टाहास आहे. तर दुसरीकडे लोकसभेचा स्ट्राईक रेट, मुख्यमंत्री शिंदेंची वाढलेली लोकप्रियता यामुळे शिवसेनेला अधिक जागा मिळाव्या अशी शिवसेनेची मागणी आहे. अखेरच्या तीस जागांसाठी महायुतीची अजूनही रस्सीखेच सुरूए.

सर्व्हेविरोधात शिंदेंचा एलगार?

  • जागावाटपात तडजोड न करण्याची शिंदेंची भूमिका

  • स्ट्राईक रेट,सर्व्हेचं कारण यंदा शिंदेंना अमान्य

  • भाजपच्या काही उमेदवारांबाबत शिंदेंसेना नाराज

  • अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळत असल्यानं तिढा कायम

लोकसभेला शिंदे गटाला सर्व्हेचे कारण देत भाजपनं जास्त जागा लढवल्या तर काही जागांचे उमेदवार बदलले होते.यावेळी शिंदेंनी काहीशी मवाळ भूमिका घेतली होती. गेल्या अडीच वर्षातील मुख्यमंत्र्यांची प्रतिमा, त्यांनी केलेलं काम, सामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्याची ताकद यावरून विधानसभेला शिवसेनेला जास्त जागा जिंकून येण्याचा विश्वास आहे..त्यामुळे शिंदेंनी तडजोडीला नकार दिल्याचं कळतंय..त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी यावर काय तोडगा काढणार हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

SCROLL FOR NEXT