Disha Salian case: BJP Maharashtra president Ravindra Chavan commented on the CBI investigation saam tv
Video

दिशा सालियन प्रकरणात ठाकरेंनी सत्तेचा गैरवापर केला? तपास यंत्रणेवर काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष?

Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरणातील CBI तपासाच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तपास यंत्रणेबाबत भूमिका मांडली. ठाकरेंवरील आरोप आणि राजकीय वादाची सविस्तर माहिती वाचा.

Bharat Jadhav

सीबीआयकडून 'दिशा सालियन' प्रकरणाचा तपास केला जातोय. याप्रकरणी सीबीआयनं एफआयआर (FIR) दाखल केला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीही नावे ओढली जात आहेत. त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशाच भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याप्रकरणी मोठं विधान केलं. तपास यंत्रणेबाबतही त्यांनी मत मांडलंय. तपास यंत्रणा चुकीचं करतेय की बरोबर हे बोलणं योग्य ठरणार नसल्याचं रवींद्र चव्हाण म्हणालेत. रवींद्र चव्हाण साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट कार्यक्रमात बोलत होते.

आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटलंय. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावरून आपली नाराजी व्यक्त केलीय. ठाकरेंनी हे प्रकरण दडपण्यासाठी आपल्या सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला जात असल्यानं उद्धव ठाकरे संतापलेत. या निराधार चारित्र्यहननाचा आता अतिरेक झालाय. हे बंद झाले नाही तर कोणाचाही सल्ला न घेता कायदेशीर कारवाई करू असा इशारा ठाकरेंनी दिलाय. आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यावरून प्रतिक्रिया दिलीय.

दिशा सालियन प्रकरणात काय म्हणाले रवींद्र चव्हाण?

साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट कार्यक्रमात बोलताना चव्हाण म्हणाले की, याप्रकरणी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या पाहिजे. त्यामुळे ते चुकीचे आहे किंवा बरोबर आहे हे कोणी म्हणू शकत नाही. ते ठरवण्याचा अधिकार त्या यंत्रणेला आहे. त्यामुळे तपास यंत्रणेने निरपेक्ष तपास केला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BSNL Recharge Plan: फक्त १ रुपयात २४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन; २४GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या फायदे

Banana Vs Pomegranate Fruit Benefits: केळी खावी की डाळिंब? डॉक्टरांच्या मते 'हे' फळ देतं शरीराला दुप्पट ताकद; पाहा आश्चर्यकारक फायदे

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

Gondhal Movie: ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपटाची एंट्री! 'गोंधळ'ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 हजाराच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT