FDA officials seizing adulterated milk in Shirpur following viral video exposure. Saam Tv
Video

Saam Impact: धुळ्यात दूध भेसळ! साम टीव्हीच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग, FDAच्या अधिकाऱ्यांची कारवाईसाठी धावपळ|VIDEO

Dhule Shirpur Milk Adulteration News: शिरपूर येथील दुधात भेसळ असल्याचे साम टीव्हीने उघडकीस आणल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तत्काळ कारवाई सुरु केली.

Omkar Sonawane

धुळे: शिरपूर येथील दुधामध्ये भेसळ असल्याची बातमी साम टीव्हीने प्रसारित केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने याची दखल घेतली आहे. सोशल मीडियावर दुधातील भेसळ दाखवणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाच्या संपूर्ण टीमने शिरपूर येथे संबंधित दुकानात पोहोचून दुधाचे नमुने घेतले. नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, या दुधात खरंच भेसळ आहे का याची शहानिशा करण्यात येणार आहे. शिरपूर पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत जवळपास ५०० हून अधिक लिटर दूध फेकण्यात आले आहे. संबंधित दुकानाच्या गोडाऊनमध्ये साठवलेल्या उर्वरित दुधाची देखील तपासणी करण्यात आली आहे. भेसळ असल्याचा संशय असल्यामुळे आणि कोणालाही शारीरिक इजा होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून उर्वरित दूध फेकण्यात आले आहे. सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे प्रशासनाच्या कारवाईला गती मिळाली असून, नागरिकांना सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राष्ट्रीय पातळीवरील 38 वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा पुढे ढकलली

Girija Oak: नॅशनल क्रश गिरिजा ओकबद्दल या गोष्टी कोणालाच माहित नाही

Kalyan News : नगर-पुण्यानंतर कल्याणमध्ये बिबट्याची दहशत, कुत्रे-जनावारांवर हल्ला, नागरिकांसमोर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न

Kitchen Cleaning Hacks : किचनमधील मळकट भांड्यांना पुन्हा नवीन चमक द्या, आताच ट्राय करा घरगुती उपाय

Priyanka Chopra : पिवळी साडी, हातात बंदूक अन् पायात कोल्हापूरी; देसी गर्ल महेशबाबूसोबत करणार ॲक्शन

SCROLL FOR NEXT