Indigo Saam TV
Video

Indigo Airplane : मधमाशांमुळे इंडिगो विमान उड्डाण रखडले, नेमकं काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Dharashiv - Jaipur : धाराशिवहून जयपूरला जाणारी इंडिगोची विमानसेवा मधमाशांमुळे अडचणीत आल्याचं समोर आले आहे. विमानाच्या दरवाजावर मधमाशांच्या टोळीने कब्जा केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धाराशिवहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानसेवेवर आज अनपेक्षित मधमाशांमुळे अडथळा निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. विमानाच्या दरवाज्यावर मधमाशांनी अचानक झुंडीने कब्जा केल्याने एकच गोंधळ उडाला.या प्रकारामुळे प्रवासी आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते.

सुरक्षेच्या दृष्टीने विमानाच्या उड्डाणाला काही वेळासाठी स्थगिती देण्यात आली होती. विमानाच्या उड्डाणाला उशीर झाल्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले होते.विमानतळ प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करत मधमाशी नियंत्रण पथकाला पाचारण केलं. त्यांनी विशेष पद्धतीने मधमाशा हुसकावून लावण्याचे प्रयत्न सुरू केले. काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि विमानाची नियमित कार्यवाही पुन्हा सुरू करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT