श्रीमंत राजे यशवंत राजे होळकर यांच्या नावाने राज्यामध्ये धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून धनगर समाजातील विद्यार्थी यांना या योजनेमधून विविध लाभ दिले जातात. या योजनेच्या माध्यमातून हंगामी वस्तीग्रह या वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्याचबरोबर राहण्यासाठी आणि संपूर्ण सुविधा या शासनामार्फत मोफत दिल्या जातात. मात्र, या योजनेचे बीड जिल्ह्यात तीन तेरा वास्तांना पाहायला मिळत आहेत.
योजनेचे नावाखाली संस्थाचालक कोट्यावधी रुपये कमवतात मात्र, सर्वसामान्यांचे लेकरं या संस्थेमध्ये शिकवण्यासाठी टाकले जातात. मात्र, त्यांना शासनाने दिलेल्या सुविधा दिल्या जात नाहीत ह्या संपूर्ण प्रकार बीडच्या शिरूर तालुक्यातील बाल नंदनवन येथील असून या वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांना जेवण त्याचबरोबर शालेय पोषण आहार राहण्यासाठी, झोपण्यासाठी ज्या सुविधा दिल्या पाहिजे त्या दिल्या जात नाही. या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी दोनमजली इमारत असून ती इमारत संस्थाचालक स्वतःला राहण्यासाठी उपयोगात आणत असून विद्यार्थ्यांना पत्रांच्या खोल्यांमध्ये राहावं लागतं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कपडे हाताने धुवावे लागतात.
तर विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गार पाणी तर जेवणासाठी वेळेवरती पोषण आहार दिला जात नाही असा देखील आरोप केला असून हा संपूर्ण प्रकार साम टीव्ही ने उघडकिस आणला. आमच्या प्रतिनिधींनी स्पॉटवर जाऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता सर्व गैरप्रकार समोर आला असून विद्यार्थ्यांना श्रीमंत राजे यशवंत राजे होळकर योजनेच्या माध्यमातून ज्या सुविधा दिल्या पाहिजेत त्या दिल्या जात नाहीत हे देखील समोर आलेलं आहे. त्याचबरोबर या संस्थेमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जे की विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गार पाणी त्याचबरोबर जेवणासाठी सुविधा मिळत नाही तर कपडे देखील हाताने धुण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे याच बाल नंदनवन येथील हा व्हिडिओ सध्याला प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.