Prakash Solanke addressing the media on the Narco Test demand for Jarange-Munde case. Saam Tv
Video

धनंजय मुंडेंनी जरांगेंचं आव्हान स्वीकारुन नार्को टेस्ट करावी; कुणी केली मागणी? VIDEO

Prakash Solanke Statement On Narco Test: माजलगावचे आमदार प्रकाश सोंळके यांनी मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. नार्को टेस्टमुळे खरी माहिती समोर येईल.

Omkar Sonawane

मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातील रचलेला कट हे खूप निंदनीय आणि दुर्दैवी प्रकार आहे. तुम्हाला एखाद्या समाजाच्या नेत्याला अशा पद्धतीने कट कारस्थान करून संपवायचं असेल तर हे निंदनीय आहे. मनोज जरांगे पाटील यांनी नार्को टेस्टचं आव्हान स्वीकारलं आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी लवकरात लवकर नार्को टेस्ट करावी म्हणजे जे कोणी आरोपी आहेत ते समोर आहे. आणि एफ आय आर देखील रजिस्टर झाला आहे. आणि आणखी कोणी आरोपी असतील तर ते नार्को टेस्टच्या माध्यमातून समोर येतील.

मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान दिले आहे की, मी नार्को टेस्ट करायला आजही तयार आहे, आणि यामुळे दोघांचीही नार्को टेस्ट व्हायला हवी. यामधून खरी माहिती जनतेसमोर येईल अशी प्रतिक्रिया माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली आहे. त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्या लोकांना पक्षांनी स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिली आहे. तेच लोकप्रतिनिधी माझ्या मतदारसंघातील विरोधी गटातील लोकांसोबत बैठका घेत आहेत. त्या गुप्त बैठकांसंदर्भात सर्व माहिती मी पक्षश्रेष्ठींकडे दिली आहे. याची लवकरच दखल घेतली जाईल. असे आमदार प्रकाश सोंळके म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गोरेगाव आरे कॉलनी परिसरात मोठा अपघात

Shocking : ठाणे हादरलं! कोर्टाजवळ कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, गुंगीचे औषध देऊन नको ते केलं

Winter Halwa Recipes :थंडीत शिराच कशाला? करा गरमा गरम भाज्यांचा मऊसूत हलवा, वाचा रेसिपी

बारावी पास असाल तर सरकारी नोकरीची संधी सोडू नका, ५०,२८९ जागांवर निघाली भरती

Rohit Sharma: मी जाड होईन पुन्हा...! यशस्वी जैयस्वालने केक भरवताच रोहित शर्माने दिली मजेशीर कमेंट

SCROLL FOR NEXT